
जळगाव, दिनांक १७ मे २०२५:
देशातील आणि राज्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी सुरू असलेल्या ‘आयुष्मान भारत योजना’ आणि ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे हजारो गरजू लाभांपासून वंचित राहत आहेत. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मतीन पटेल (वय ३८, रहिवासी : शहीद अब्दुल हमीद चाळ, तांबापूर) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित वरिष्ठ अधिकार्यांना ईमेलद्वारे तक्रार व निवेदन पाठवले आहे.
मतीन पटेल यांनी आपल्या ईमेल तक्रारीत म्हटले आहे की, सध्या या योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी १२ अंकी राशन कार्ड अनिवार्य असल्याची अट लावण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक गरीब, स्थलांतरित, भूमिहीन, अल्पशिक्षित नागरिकांना उपचार मिळू शकत नाही.
योजनेतील मुख्य अडचणी:
- १२ अंकी राशन कार्डाची सक्ती: अनेक गरजूंना हे कार्ड नसल्यामुळे थेट लाभ नाकारला जातो.
- वेबसाइट वेळेवर चालत नाही: हॉस्पिटलमध्ये दाखल होताना योजनेची अधिकृत वेबसाइट ओपन न झाल्यामुळे रुग्णांची नोंदणी अडते.
- हेल्पलाइन नंबर सतत बंद: गरजू रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळत नाही, वेळेत माहिती न मिळाल्यामुळे खासगी उपचार करावे लागतात.
- मर्यादित कोटा आणि BPL आधारित लाभ: योजना केवळ जुन्या जनगणनेतील BPL कुटुंबांपुरती मर्यादित आहे, तर वास्तविक गरीब नागरिक वगळले जात आहेत.
मागण्या:
- १२ अंकी राशन कार्डाची सक्ती रद्द करावी.
- आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, ई-श्रम कार्ड यासारख्या पर्यायी ओळखपत्रांवरही योजना लाभ देण्यात यावा.
- योजना वेबसाईटचे तांत्रिक अपग्रेड करावे.
- हेल्पलाइन नंबर तत्काळ सुरू करून प्रतिसादक्षम करावेत.
- कोटा पद्धती बंद करून सर्व गरीबांना समान आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी.
ही तक्रार ईमेलद्वारे मा. आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव) यांच्यासह, खालील संबंधित वरिष्ठ अधिकार्यांना सादर करण्यात आली आहे:
- श्री. जयंत कुमार बांठिया (आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग)
- श्री. भूषण गगराणी (सचिव, FW)
- डॉ. के. वेंकटेशम (मुख्य कार्यकारी अधिकारी, आरजीजेएवाय)
- डॉ. राजू एम. जोतकर (सहाय्यक संचालक, आरजीजेएवाय)
- श्री. प्रमोदकुमार प्रामाणिक (दक्षता अधिकारी)
- डॉ. सुहास रानडे (सल्लागार, RGJAYS)\
मतीन पटेल यांनी स्पष्ट केले आहे की, “आरोग्य हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क असून, योजनांच्या अटी व तांत्रिक अडचणी दूर करून गरीब व गरजूंना तत्काळ आणि सुलभ उपचार मिळाले पाहिजेत.”
जर तुम्हाला या बातमीचं *व्हिडीओ
Add a Comment