CrimeEntertainment

दहिगाव इम्रान पटेल हत्याकांड : विशेष समितीमार्फत चौकशी करा – विविध संघटनांची मागणी

यावल : दहिगाव येथे घडलेल्या इम्रान पटेल हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या हत्येप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर गजानन पाटील आणि गजानन रवींद्र कोळी या दोघांनी थेट यावल पोलिस स्टेशनमध्ये हजर होऊन आत्मसमर्पण केले. घटनेनंतर जळगाव जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यावल येथे दाखल झाले व रुग्णालय तसेच पोलिस ठाण्यात भेट देत माहिती घेतली.

एकता संघटना व इतरांचे निवेदन

जळगाव जिल्हा एकता संघटनेचे फारुक शेख, कौमी एकता संघटनेचे कुरबान शेख, हुफ्फाझ फाउंडेशनचे रहीम पटेल,ग्लोबल न्यूजचे मतीन पटेल, सामाजिक कार्यकर्ते अनिस शाह, एस.डी.पी.आय.चे मौलाना कासिम नदवी, राष्ट्रवादी गटाचे कासिम उमर आदींनी यावल येथे उपस्थित पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याशी थेट चर्चा केली.

कठोर शिक्षा व तपास जलदगतीने होणार

या चर्चेत फारुक शेख यांनी पोलिसांकडे हत्याकांडातील त्रुटींबाबत माहिती देत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी, हा खुनाचा प्रकार निर्गुण आहे. तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल,” असे आश्वासन दिले.

विशेष समितीद्वारे चौकशीची मागणी

ही घटना गंभीर असल्याने चौकशीसाठी विशेष समिती गठित करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, अशी लेखी मागणी संघटनांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

अंत्ययात्रेत हिंदू-मुस्लिमांचा मोठा जनसागर

दहिगाव येथे इम्रान पटेल यांच्या अंत्ययात्रेला हजारो लोकांची उपस्थिती होती. हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकात्मतेचा संदेश दिला.

यावल पोलिस स्टेशनमध्ये संतप्त जमावाला शांत करताना फारुक शेख, अनिस शाह, मतीन पटेल, कुरबान शेख, जावेद जनाब, अँड. अलीम खान हे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *