Entertainment

महांकाळा गावात भव्य फ्री मेडिकल कॅम्प : 150 पेक्षा अधिक नागरिकांची तपासणी, ग्रामस्थांकडून कौतुकाची थोपटी

📰 ग्लोबल न्यूज 24 लाइव्ह | महांकाळा विशेष रिपोर्ट/ (ता. धरनगाव) —
फैजान-मदीना बहुउद्देशीय संस्था, पालधी यांच्या वतीने संवेदना हॉस्पिटल यांच्या सहकार्याने महांकाळा गावात दिनांक 16 नोव्हेंबर 2025 (रविवार) रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कॅम्पला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 150 हून अधिक नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला. कॅम्पमध्ये ईसीजी, शुगर टेस्ट, जनरल चेकअप, विविध आजारांची तपासणी, तसेच आवश्यक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले.

या आरोग्य उपक्रमासाठी मुस्लिम बिरादरीतील सेवाभावी व्यक्ती हाजी शेख रफिक शेख मुसा, मोहम्मद शरीफ शेख मुसा, तसेच ग्रामपंचायत सरपंच शकील पटेल, सदस्य निसार पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद इब्राहिम कुरेशी, तसेच इदरीस अहमद यांच्यासह गावातील अनेक कार्यकर्त्यांनी कॅम्प यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला.

गावकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत असे शिबिर पुढेही नियमित आयोजित करण्याची मागणी केली आहे. महांकाळा गावातील हा उपक्रम सामाजिक ऐक्य आणि आरोग्य जनजागृतीचे सुंदर उदाहरण ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *