Entertainment

मॉब लिंचिंग प्रकरणातील आरोपींना डिफॉल्ट जामिन — पोलिसांची जाणूनबुजून निष्काळजीपणा की दबावाखाली केलेली कारवाई? तपासाची मागणी!

ग्लोबल न्यूज 24 लाइव्ह | जळगाव (12 नोव्हेंबर):
जामनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 288/2025 दिनांक 11/08/2025 अंतर्गत झालेल्या मॉब लिंचिंग च्या भयंकर प्रकरणात आरोपींना डिफॉल्ट जामिन मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
एकता संघटनेचे अध्यक्ष फारूक शेख यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन एसआयटीकडून झालेल्या निष्काळजी तपासाची आणि जाणूनबुजून करण्यात आलेल्या विलंबाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली

या प्रकरणात सुलेमान पठाण या युवकाला सुमारे 20 ते 25 जणांच्या जमावाने निर्दयतेने मारहाण करून ठार केले होते. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(2) (मॉब लिंचिंग) सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कलमानुसार आरोपींना मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
तथापि, पोलिसांकडून 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही, ज्यामुळे आरोपी अभिषेक राजपूत, रंजीत मटाडे, घनश्याम शर्मा आणि दीपक घिसाडी यांनी त्यांच्या वकिलामार्फत न्यायालयात डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज दाखल करून जामिन मिळवला.

एकता संघटनेचे अध्यक्ष फारूक शेख यांनी सांगितले की,

“ही केवळ तपासातील विलंब नाही,? तर आरोपींना वाचविण्याची जाणूनबुजून केलेली कारवाई आहे. एसआयटीवर राजकीय दबाव होता की आर्थिक प्रलोभन? हे शोधण्याची वेळ आली आहे. आम्ही डीवायएसपीसह संबंधित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीची मागणी केली आहे.”


प्रतिनिधी मंडळात सहभागी

फारूक शेख, मतीन पटेल, मुख्तार पिंजारी, अन्वर सिकलगर, हाफिज कासिम नदवी, झकी पटेल, हाजी युसुफ शेख, अरमान पटेल, सईद शेख, सलीम इनामदार, जावेद शेख, युसुफ खान (बुलेट), चिरागुद्दीन शेख आदी सदस्य उपस्थित होते.


👮‍♂ जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आश्वासन

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रतिनिधी मंडळाला सांगितले की,

“दोन दिवसांच्या आत सत्र न्यायालयात डिफॉल्ट जामिन रद्द करण्यासाठी आम्ही अपील दाखल करू. पोलीस विभागाने 7 नोव्हेंबर रोजीच आरोपपत्र तयार केले होते, परंतु न्यायालयातील लिपिकाच्या क्युरेशन प्रक्रियेतील तांत्रिक कारणे आणि सुट्टीमुळे विलंब झाला.”

तथापि, फारूक शेख यांनी या स्पष्टीकरणावर नाराजी व्यक्त करत सांगितले की

“लक्षात ठेवा, आम्ही मागे हटणार नाही जोपर्यंत निष्काळजीपणा, दबाव किंवा प्रलोभनाच्या बाबतीत संपूर्ण सत्य बाहेर येत नाही. दोषी कोणताही असो, आम्ही न्यायासाठी लढा सुरू ठेवू!

1️⃣ फारूक शेख, मतीन पटेल, शफीक नदवी, युसुफ खान, झकी पटेल आदीजण पोलीस अधीक्षकांना एसआयटी तपासातील निष्काळजीपणाबाबत तक्रारपत्र आणि सत्र न्यायालयात अपील दाखल करण्याबाबत मागणीपत्र देताना दिसत आहेत.
2️⃣ फारूक शेख पत्रकारांशी संवाद साधताना, त्यांच्या सोबत शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित आहेत.


✊ ग्लोबल न्यूज 24 लाइव्ह |

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *