Crime

लोकल क्राईम ब्रांच (LCB) ला MIDC हद्दीत MD ड्रग्ज जप्तीमध्ये मोठे यश

ग्लोबल न्यूज़ 24 लाइव:
जळगाव :
सूत्रांच्या माहितीनुसार, लोकल क्राईम ब्रांच (LCB) ला काल रात्री मोठे यश मिळाले. MIDC परिसरातून एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे? ही कारवाई संपूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेनुसार करण्यात आली आहे.

मात्र या कारवाईमुळे अनेक गंभीर प्रश्नही निर्माण झाले आहेत. इतक्या संवेदनशील आणि धोकादायक प्रकारचे अमली पदार्थ थेट MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत सापडतात, आणि स्थानिक पोलिस निरीक्षकांना याची माहितीही नसते? इतक्या मोठ्या प्रमाणावरचा साठा त्यांच्या नाकाखाली सापडणे ही बाब निश्चितच गंभीर मानली जात आहे. त्यामुळे MIDC पोलिस यंत्रणेवर सरळसरळ प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

LCB च्या या धाडसी कारवाईचे शहरभरातून कौतुक होत आहे. मात्र दुसरीकडे आणखी एक गंभीर वास्तव उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचा आदेश जारी केला होता. त्यावेळी या कारवाईला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला होता की, आता शहरात बेकायदेशीर धंदे पूर्णपणे थांबतील.

मात्र तोच फर्मान धुडकावून आता हेच अवैध धंदे पुन्हा खुलेआम सुरू झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरचे धंदे पुन्हा सुरू होणे म्हणजे थेट कायद्याला आव्हान दिल्यासारखे आहे.

शहरात नशाखोरी, अमली पदार्थांचा प्रसार आणि अवैध धंदे यामुळे युवकांचे भवितव्य धोक्यात येत आहे. नोकरी, शिक्षण यामध्ये अडथळे निर्माण होतात. गुन्हेगारीला खतपाणी मिळते. एकीकडे LCB सतत प्रयत्न करून मोठ्या प्रमाणावर कारवाया करत आहे, तर दुसरीकडे शहरात अवैध धंदे पुन्हा सुरू होणे ही बाब प्रशासनासाठीही मोठी लाजिरवाणी मानली जात आहे.

म्हणूनच नागरिक आता थेट प्रश्न विचारत आहेत की — “जे धंदे बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, ते पुन्हा कोणाच्या आशीर्वादाने सुरू झाले?” आणि “स्थानिक पोलिस यंत्रणा या सगळ्याकडे डोळेझाक का करते आहे?”

शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर यामुळे गडद प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. LCB ची ही कारवाई नक्कीच स्तुत्य आहे, परंतु कायमस्वरूपी उपाययोजना करून अवैध धंदे आणि अमली पदार्थ यांना आळा बसवणे ही जबाबदारी प्रशासनाचीदेखील आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *