Entertainment

लोकल क्राईम ब्रांच (LCB) ला MIDC हद्दीत MD ड्रग्ज जप्तीमध्ये मोठे यश

जळगाव :
सूत्रांच्या माहितीनुसार लोकल क्राईम ब्रांच (LCB) ला काल रात्री मोठे यश मिळाले. MIDC परिसरातून एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई संपूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेनुसार झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

मात्र प्रश्न असा निर्माण होतो की — इतक्या संवेदनशील व धोकादायक अमली पदार्थांचा साठा थेट MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीतून सापडतो, आणि स्थानिक पोलिस निरीक्षकांना याची माहिती सुद्धा नसते? हे नक्की कसे शक्य झाले? हा प्रश्न आता शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

LCB च्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण दुसरीकडे आणखी एक गंभीर मुद्दा पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचा आदेश जाहीर झाला होता. मात्र तो फर्मान धुडकावून आता हेच अवैध धंदे पुन्हा खुलेआम सुरू झालेले दिसत आहेत. यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीवर थेट प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे?

शहरात अमली पदार्थ व अवैध धंद्यांचे पुन्हा डोके वर काढणे ही नक्कीच चिंताजनक बाब आहे? यामुळे तरुण पिढीच्या भवितव्यावर गंडांतर येऊ शकते आणि गुन्हेगारीला खतपाणी मिळण्याचा धोका वाढतो.

त्यामुळे LCB ची ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे; परंतु या सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी अंकुश आणणे ही जबाबदारी स्थानिक पोलिस प्रशासनाची आहे, असे नागरिकांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *