राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी जळगावच्या मुलींना सुवर्णसंधी

जळगाव: मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी पुणे येथे १ ते ७ मार्च २०२५ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय सब-ज्युनियर आणि ज्युनियर मुलींच्या हॉकी स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन हॉकी महाराष्ट्रतर्फे करण्यात आले आहे.

या निवड प्रक्रियेसाठी जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडूंची निवड चाचणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे २२ फेब्रुवारी २०२५, शनिवार रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.

अर्जदारांसाठी महत्त्वाची माहिती:

  • सब-ज्युनियर गट: जन्मतारीख ०१/०१/२००९ किंवा त्यानंतरची असावी.
  • ज्युनियर गट: जन्मतारीख ०१/०१/२००६ किंवा त्यानंतरची असावी.
  • सहभागी खेळाडूंनी सकाळी ७:३० वाजता उपस्थित राहावे.
  • आवश्यक कागदपत्रे: जन्म दाखला, आधार कार्ड आणि शाळेचा दाखला यांची प्रत अनिवार्य.

हॉकी महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे आणि हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे सर्व पात्र खेळाडूंना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *