ग्लोबल न्यूज़ 24 लाइव: जलगाव जिल्ह्यातील ताँबापूर आणि मेहरून येथील रहिवाशांनी होळीच्या दिवशी देशात एक अनोखी मिसाल प्रस्थापित केली. हिंदू-मुस्लिम समाजाने एकत्र येऊन होळी साजरी केली आणि ऐक्याचा सुंदर संदेश दिला. या उपक्रमात जलगाव शहराच्या एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि एसपी ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिस दीपरमेन्ट चे नाखाथे साहेब, संदीप गणीत साहेब आणि समाजसेवक, नगरसेवक, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रेमाने एकमेकांना गुलाल लावला आणि बंधुत्वाचा संदेश दिला. विशेष म्हणजे, जिथे देशाच्या काही भागांत धार्मिक तणाव पाहायला मिळतो, तिथे महाराष्ट्रातील जनता मात्र प्रेम आणि ऐक्याचा संदेश देत आहे.
यावेळी उपस्थित समाजसेवकांनी ठरवले की, येत्या रमजान महिन्यातही हा बंध प्रबळ करायचा. रमजान ईदच्या दिवशी ताँबापूर येथे हिंदू बांधवांना निमंत्रित करून शीरखुर्म्याची मेजवानी देण्यात येईल आणि गोडवा वाढवला जाईल.
महाराष्ट्रातील जनतेने या ऐक्याच्या संदेशाने कट्टरतावादी प्रवृत्तींना स्पष्ट संदेश दिला आहे की, महाराष्ट्र एकता आणि बंधुत्वाचा गड आहे आणि राहणार आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी एमआयडीसी पोलिस स्टेशन, एसपी ऑफिस आणि सहभागी समाजसेवकांचे विशेष आभार!
Add a Comment