जर पोलिसच सुरक्षित नाहीत, तर जनता कशी सुरक्षित राहणार? पोलिसावर होत असलेल्या हल्याचा निषेधा सह आरोपीवर कार्रवाईची मागणी- एकता संघठन

न्यूज रिपोर्ट:
जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे पोलिस दलावर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे महिला आणि पुरुष कर्मचारी सरकारी कामासाठी आरोपीच्या शोधात गेले असता, स्थानिक रहिवाशांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये महिला पोलिस कॉन्स्टेबल योगिता पाचपांडे व इतर कर्मचारी जखमी झाले.

ही घटना पोलिस दलाच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. इतकेच नव्हे, तर याआधीही पाळधी गावात ३१ डिसेंबर २०२४ रोजी मुस्लिम समाजाच्या २३ दुकाने पेटवून दिली होती, मात्र अद्याप मुख्य आरोपी मोकाट फिरत आहेत. पोलिस दलाने वेळेत कारवाई केली नाही, तर या भागात गुन्हेगारी वाढून नक्षलवादासारखी स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, पिंपळगाव हरेश्वर येथे ११ जानेवारी रोजी सानीयाबी शेख अलीम हिला जबरदस्तीने पळवून नेल्याची तक्रार असून, पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. निभोंरा पोलिस स्टेशन अंतर्गत मौलाना इरफान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, मात्र मुख्य आरोपी पवन खराटे याला अद्याप अटक नाही.

तसेच, शिरसोली येथे गोमांस विक्रीच्या संशयावरून ६५ वर्षीय शेख युनूस शेख बुरहान यांना गोरक्षकांनी अमानुषपणे मारहाण केली आणि त्यांच्या पत्नीवरही अत्याचार झाले, पण पोलिसांनी फक्त NCR दाखल करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

एकता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिनिधिमंडल मधे फारूक शेख, नदीम मलिक, अनवर खान, मतीन पटेल, अनीस शाह, मजहर पठान, सैयद इरफान, कासिम उमर, इमरान शेख, नजमुद्दीन शेख, सईद फैयाज, रेहान पिंजारी आदि शामिल होते । घटनांचा तीव्र निषेध करत जळगाव पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. दलाने निष्पक्ष कारवाई न केल्यास लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल आणि हा भाग नक्षलवादाकडे झुकण्यास वेळ लागणार नाही.

पोलिस दलाने कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता कठोर कारवाई करावी,” अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *