
📃 विशेष रिपोर्ट | ग्लोबल न्यूज 24 लाईव्ह
जळगाव शहरात सध्या एक गंभीर आणि चिंताजनक चित्र उभं राहिलं आहे. उघड्यावर विकला जाणारा गुटखा, अफू, गांजा, एम.डी. ड्रग्स, बनावट आणि बिनपरवाना दारू, आणि संशयास्पद मनी ट्रान्सफर सिस्टम – या सर्व गोष्टी समाजाच्या मुळावर घाव घालू लागल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार” शहरातील अनेक भागांमध्ये हे अवैध धंदे इतक्या संगठित पद्धतीने सुरू आहेत की, जणू कायदा आणि प्रशासन यांचं अस्तित्वच नाही.
प्रश्न असा आहे – या गोरखधंद्यांच्या मागे कोणत्या अदृश्य ताकदी आहेत? काही जबाबदार अधिकाऱ्यांची छत्रछाया या अवैध धंद्यांना मिळत आहे का?
🔹 ड्रग्स आणि एम.डी. मुळे बर्बाद होणारी पिढी:
शहरातील लहान मुलांपासून ,युवकांपर्यंत अनेक जण या नशेच्या आहारी जात आहेत. ही केवळ सामाजिक शोकांतिका नसून, शहराच्या भविष्यासाठीही मोठा धोका आहे.

🔹 हवाला रॅकेट – देशाच्या सुरक्षेला धोका?
हवाला ही अशी प्रणाली आहे ज्यामध्ये पैसे कोणतीही अधिकृत नोंद न ठेवता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवले जातात. ही पद्धत देशद्रोही, नक्षलवादी किंवा अतिरेक्यांसाठी उपयुक्त ठरू शकते.
हवाला जळगावात खुलेआम सुरू आहे, ही बाब अत्यंत गंभीर

🔹 दारूचा काळाबाजार:
अनेक ठिकाणी बिनपरवाना आणि बनावट पद्धतीने दारू बनवून विकली जात आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण होत आहेत.
🔹 राजकीय प्रतिक्रिया – एकनाथराव खडसे यांचे वक्तव्य:
महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि आमदार एकनाथराव खडसे यांनी अलीकडेच जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले की,
“ड्रग्स आणि गुटख्याचा व्यवसाय तरुण पिढीला बरबाद करत आहे. मी हे प्रकरण विधानसभेत मांडणार आहे.”
त्यांचे हे विधान हे दाखवते की ही समस्या आता सामान्य पातळीवर नाही – ती खोलवर रुजलेली आहे.
⚠ ज्या भागांमध्ये हे अवैध व्यवहार सुरू आहेत, तिथे काय योग्य ती कारवाई होत आहे का?
काही ‘संशयित’ घटकांना जर का ‘अनदेखी’चा फायदा मिळत असेल, तर याचा विचार होणं आवश्यक आहे.?
(हे आरोप नाहीत – प्रश्न आहेत ???

ग्लोबल न्यूज 24 लाईव्हकडे अनेक भागांचे फोटो, व्हिडीओ क्लिप्स आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष उपलब्ध आहे – जे आम्ही आगामी भागांमध्ये जनतेसमोर मांडणार आहोत.
✊ आमचा संकल्प:
आम्ही कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला बदनाम करण्यासाठी नव्हे, तर सत्य जनतेसमोर आणण्यासाठी आणि जळगाव शहराला नशामुक्त व सुरक्षित बनवण्यासाठी ही मोहिम चालवत आहोत.
📣 “जळगावला बरबादीपासून वाचवायचं असेल – तर आता आवाज उठवणं गरजेचं आहे!”
ग्लोबल न्यूज 24 लाईव्ह*घेऊन येत आहे
📺 “एक्स्पोज सिरीज – भाग 1”
लवकरच… येत आहे आमच्या यूट्यूब चैनल वर चैनल ला सब्सक्राइब करा आणि बैल आइकॉन ला किलिक करा.

M D
Add a Comment