ग्लोबल न्यूज 24 लाईव्ह विशेष बातमी:
महाराष्ट्र सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा उद्देश गरिबांना मोफत उपचार मिळवून देणे हाच होता. ही योजना राबवण्यामागचा मुख्य हेतू असा की, आर्थिक अडचणीमुळे कोणाचाही उपचार थांबू नये. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेतून राज्यातील पात्र रुग्णांना ₹5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार दिला जातो.

मात्र आज ही योजना काही अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये अनियमितता, लूटमार आणि शासकीय नियमांचं उल्लंघन यांचं केंद्र बनली आहे.
आरोग्य मित्र’ फक्त नावापुरते उरलेत का ?
या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक सूचीबद्ध रुग्णालयात “आरोग्य मित्र” नेमण्यात आले आहेत. त्यांची जबाबदारी असते:
- रुग्णांना या योजनेची सविस्तर माहिती देणे,
- आवश्यक कागदपत्रे गोळा करून ऑनलाईन अर्ज करणे,
- शासकीय मंजुरी मिळवून उपचार सुरू करून देणे,
- आणि रुग्णांकडून कोणत्याही स्वरूपाचा पैसा घेऊ न देणे.
पण प्रत्यक्षात अनेक रुग्णालयांमध्ये काही आरोग्य मित्र अनुपस्थित असतात, किंवा उपस्थित असूनही ते रुग्णांशी संपर्क करत नाहीत.
सरकारी नियमांनुसार, आरोग्य मित्राला रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बसवणे बंधनकारक आहे, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या रुग्णाला योजनेची माहिती लगेच मिळेल. परंतु अनेक ठिकाणी रुग्णांना योजनेबाबत माहिती मिळत नाही आणि ते मोफत उपचाराऐवजी लाखो रुपये भरून उपचार घेण्यास भाग पडतात.

💰 मंजुरी मिळाल्यावरही जबरदस्तीने पैसे उकळले जातात
अनेक तक्रारींमधून समोर आले आहे की, काही रुग्णांना योजनेची मंजुरी मिळूनही रुग्णालयांनी “बेड उपलब्ध नाही”, “प्रक्रिया वेळखाऊ आहे”, “फाईल अजून पोर्टलवर नाही” असे सांगून रुग्णांकडून तातडीने ₹1.5 ते ₹5 लाखांपर्यंतचे पैसे घेण्यात आले.
काही प्रकरणांमध्ये तर हे स्पष्टपणे दिसून आले आहे की, रुग्णाकडून पैसेही घेतले आणि योजनेद्वारे शासकीय पेमेंटही रुग्णालयाने घेतले — म्हणजेच डबल वसुली. हे पूर्णपणे बेकायदेशीर असून संबंधित डॉक्टर, रुग्णालय आणि आरोग्य मित्र यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.
⚖ महात्मा फुले योजनेचे नियम काय सांगतात?
या योजनेचे स्पष्ट नियम पुढीलप्रमाणे आहेत:
- मंजुरी मिळाल्यानंतर ६ तासांत उपचार सुरू होणे आवश्यक आहे
- रुग्णाकडून एकही रुपया आकारला जाऊ 0नये
- रुग्णाचा आधार व राशन कार्ड पडताळणी करून ऑनलाईन अर्ज स्वीकारावा
- आरोग्य मित्रांनी प्रत्येक रुग्णाशी प्रत्यक्ष संवाद साधणे अनिवार्य आहे
- उपचारांचा संपूर्ण डेटा योजनेच्या पोर्टलवर अपलोड होणे बंधनकारक आहे 📣 रुग्णांचा आक्रोश — सरकारने लक्ष द्यावे
ग्लोबल न्यूज 24 लाईव्हला असे अनेक प्रकरणे प्राप्त झाली आहेत जिथे:
- रुग्णांना योजनेची माहितीच दिली गेली नाही,
- मंजुरी असूनही पैसे उकळले गेले,
- आणि त्यानंतर आधार कार्ड घेऊन शासकीय योजना वापरून क्लेम देखील करण्यात आला.
ही परिस्थिती सामान्य जनतेसाठी अन्यायकारक असून शासनाने तातडीने पुढील पावले उचलावी:
- दोषी रुग्णालये आणि डॉक्टरांवर तातडीने कारवाई
- आरोग्य मित्र व्यवस्थेचे चौकशी व निरीक्षण
- योजनेअंतर्गत वसूल झालेले पैसे परत मिळवणे
- व सर्वसामान्यांना योजनेबाबत जागरूक करणे
👉 ग्लोबल न्यूज 24 लाईव्ह शासनाकडे आणि जनतेकडे विनंती करते की या मुद्द्यावर गंभीर विचार आणि खुलेपणाने चर्चा व्हावी, जेणेकरून गरजू रुग्णांना त्यांचा *हक्काचा उपचार आणि न्याय मिळू शकेल.?
Add a Comment