हरीविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखा व नव्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते उद्घाटन; महिलांची जबाबदारी निश्चित

ग्लोबल न्यूज 24 LIVE | जळगाव | 18 जुलै 2025
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हरीविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखा तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार व मनसे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

या उद्घाटन प्रसंगी महिला सेनेच्या शाखाध्यक्षपदी अनिता कापुरे यांची, तर उपशाखाध्यक्षपदी लक्ष्मी भिल यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम यांनी केले होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी महिला शाखेच्या कार्याचे कौतुक केले. “हरीविठ्ठल नगरमधील हे कार्यालय परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेच्या लढ्यात एक महत्वाचे केंद्रबिंदू ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे व महानगराध्यक्ष किरण तळेले यांनी मनसेच्या भूमिका, कार्यपद्धती व जनतेसाठी असलेल्या ध्येयधोरणांचा आढावा सादर केला.

कार्यक्रमास मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, लताबाई पाथरकर, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, वाहतूक सेना जिल्हा संघटक रज्जाकभाई सय्यद, ॲड. सागर शिंपी, साजन पाटील, सतीश सैंदाणे, संदीप मांडोळे, दीपक राठोड, पंकज चौधरी, ऐश्वर्या श्रीरामे, अनिल दिघे, अविनाश जोशी, राहुल चव्हाण, जामनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील, एरंडोल तालुकाध्यक्ष विशाल सोनार, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात आशुतोष जाधव, रोहिदास मिस्तरी, खुशाल ठाकूर, निलेश खैरनार यांच्यासह परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन ललित शर्मा व श्रीकृष्ण वेगळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी केले.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *