
जलगांव | 1 जुलाई 2025 | विशेष रिपोर्ट — Global News 24 Live
आज डॉक्टर्स डे या शुभदिनाच्या निमित्ताने अल-हुफ़ाज़ फाउंडेशन, जळगाव यांच्यातर्फे शहरातील काही नामवंत आणि सेवाभावी डॉक्टरांशी विशेष भेट घेण्यात आली. या प्रसंगी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना गुलदस्ते देऊन त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी मन:पूर्वक आभार व्यक्त केले आणि त्यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याची मन:पूर्वक प्रशंसा केली.

या उपक्रमात विशेषतःडॉ.चौधरी, डॉ. मंदार पंडित डॉ. मोइज देशपांडे, डॉ. नदीम नज़र आणि डॉ. इमरान खाटिक यांना भेट देऊन त्यांना मुबारकबाद दिली गेली आणि त्यांच्या सामाजिक व वैद्यकीय सेवेचे कौतुक करण्यात आले.
डॉक्टर हे आपल्या समाजाचे असे अनमोल रत्न आहेत जे दिवस-रात्र कुठलाही भेदभाव न करता माणसाच्या वेदनांवर उपचार करतात. विशेषतः आपल्या शहरातील असे डॉक्टर जे गरीब आणि गरजू घटकांना निःस्वार्थ आरोग्यसेवा देतात, ते खरोखरच आदर्श आणि प्रशंसनीय आहेत.

अल-हुफ़ाज़ फाउंडेशन हे नेहमीच अशा व्यक्तींच्या पाठीशी उभे राहिले आहे ज्यांनी मानवतेची सेवा हेच जीवनाचे ध्येय मानले आहे. सेवा आणि समर्पणाच्या या कार्यासाठी आम्ही सर्व डॉक्टरांचे मन:पूर्वक आभार मानतो.

अल्लाह तआला या सर्व डॉक्टरांना उत्तम आरोग्य, सुरक्षितता आणि दीर्घायुष्य प्रदान करो, आणि त्यांच्या सेवेला आपल्या दरबारात कबूल करो. आमीन.

Add a Comment