
जळगाव – पुणे येथील सिम्बायोसिस लॉ कॉलेजची विद्यार्थिनी पी. आर. शर्मिष्ठा हिने अंतिम प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा एकता संघटना तर्फे आज तीव्र आंदोलन आणि कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.
एकता संघटनेच्या महिला गटाच्या विशेष उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की, कायद्याची शिकवण घेणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असून त्याविरोधात कठोर कायदेशीर पावले उचलणे गरजेचे आहे.
महत्वाच्या प्रतिनिधींची उपस्थिती
निवेदन देताना संघटनेच्या महिला प्रतिनिधींमध्ये निलोफर युसूफ, अर्शी इक्बाल, यास्मीन समद, रुबिना अख्तर, अमिना कासम, जरीना अब्दुल रौफ, मैराज शेख, खदीजा मोहम्मद शफी, जिक्रा बागवान शेख आदींचा सहभाग होता.
पुरुषांमध्ये फारुख शेख, मौलाना कासिम नदवी, मतीन पटेल, हाफिज रहीम पटेल, अमीर शेख, अब्दुल रौफ रहीम, मुफ्ती खालिद, बाबा देशमुख आदी उपस्थित होते.
🔸 महिला गटाची जोरदार मागणी
निवेदन वाचनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांनी संताप व्यक्त केला. “मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या कोणत्याही वक्तव्याला माफ केले जाणार नाही,” असा इशारा देत शर्मिष्ठावर त्वरित कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
🔸 राष्ट्रपती, पंतप्रधान यांना सुद्धा पाठवले निवेदन
हे निवेदन जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी गजेंद्र पटोले यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री तसेच पुणे व कोलकाता पोलिस आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.
🕊 धार्मिक सलोखा आणि शांततेचे आवाहन
एकता संघटनेने समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन धार्मिक सहिष्णुता राखण्याचे आवाहन केले. “द्वेष नव्हे तर परस्पर आदर आणि सुसंवाद हाच देशाचा खरा मार्ग आहे,” असा संदेश या प्रसंगी देण्यात आला.
📌 न्यायाच्या प्रतीक्षेत – मुस्लिम समाजाचा एक सूर:
प्रेषितांवरील अपमानास्पद टिप्पणी सहन केली जाणार नाही, आणि या प्रकरणात तत्काळ व कठोर कारवाई होईपर्यंत लढा चालू राहील, असा निर्धार एकता संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
Add a Comment