“महात्मा फुले योजनेत मंजुरी मिळाल्यानंतरही रुग्णाकडून २ लाख उकळले; शासकीय योजनेच्या नावाखाली फसवणूक?”

जळगाव | प्रतिनिधी – ग्लोबल न्यूज़ 24 लाइव नेटवर्क:

“सरकारनं उपचार मोफत देण्यासाठी योजना सुरू केली… पण आमच्याकडून दोन लाख रुपये उकळले गेले. हे न्याय आहे का?” — हा सवाल एका रुग्णाच्या मुलाने यंत्रणेला विचारला आहे, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतरही, जळगावमधील एका नामांकित खासगी संलग्न हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णाच्या नातेवाईकांकडून २ लाख रुपये घेतल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे.

घटनेचा तपशील:

रुग्णाचे नाव: अस्लम खान सुलतान खान , रुग्णाचा आजार: हृदयविकार (हार्ट ब्लॉकेज — ऑपरेशन),अॅडमिटची वेळ: 2 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता, एनरोलमेंट आयडी: ABPMJAY-MJPJAY/ENR/00727423 , अप्रूव्हल वेळ: 12:10 वाजता, व्हेरिफिकेशन वेळ: 12:38 वाजता, राशन कार्ड प्रकार: ऑरेंज,आरोग्य मित्र: सागर

हॉस्पिटल: श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, जळगाव

काय घडलं नेमकं?

रुग्ण अस्लम खान यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या मुलाने — तौसीफ खान — त्यांना राज्य श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल जळगाव येथे दाखल केलं. सकाळी 10:30 वाजता अॅडमिट केल्यानंतर लगेच डॉक्युमेंट जमा करण्यात आले आणि 12:30 वाजता योजनेची मंजुरी देखील मिळाली.

मंजुरी मिळाल्यानंतरही रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले की, सलाईन चढवण्यात आली, मॉनिटरिंग सुरू करण्यात आलं, पण दिवसभरात एकही डॉक्टर ऑपरेशनसाठी आले नाहीत. रात्री 9 वाजता एका डॉक्टरने भेट दिली आणि थेट सांगितलं:

“ऑपरेशन अर्जंट आहे, पण योजना लागू होणार नाही. पैसे लागतील. योजना मंजूर झाली असली तरी पैसा येईल की नाही सांगता येत नाही. वेळ गेल्यास पेशंट वाचणार नाही.”

तसेच त्यांनी दडपण टाकत सांगितलं:

“आता लगेच ऑपरेशन करावं लागेल. पैसे भरा, नाहीतर गडबड होईल.”

या परिस्थितीत तौसीफ यांनी ₹2 लाख उभे करून दोन टप्प्यांत रक्कम भरली. यामध्ये ₹15,000 चं बाहेरील मेडिकल आणले , त्याचे बिल आणि संबंधित कागदपत्र तक्रारीसह जोडण्यात आले आहेत.

तक्रार आणि प्रतिक्रिया:

17 मे 2025 रोजी तौसीफ यांनी योजनेच्या अधिकृत ईमेलवर तक्रार दाखल केली. त्यांना GR50872/2025 असा तक्रार आयडी देण्यात आला आहे.

तौसीफ खान सांगतात की, “रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर मी घडलेला प्रकार माझ्या एका मित्राला सांगितला. त्याने या प्रकाराला फसवणूक आणि गंभीर अन्याय म्हटलं आणि मला जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ता मतीन पटेल यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.”

मी मतीन पटेल यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेली संपूर्ण घटना त्यांना सांगितली. हॉस्पिटलने योजना असूनही आम्हाला वंचित का ठेवलं याचं कारण स्पष्ट नव्हतं? हे समजल्यावर मतीन पटेल यांनी तात्काळ आम्हाला योजना, कायदे, आणि रुग्णाचा हक्क याबद्दल संपूर्ण माहिती दिली.”

“ते केवळ मार्गदर्शन करून थांबले नाहीत, आमच्यासोबत उभे राहिले. तक्रारीनंतर जेव्हा हॉस्पिटलने 10-12 दिवसांनी बोलावलं, तेव्हा मतीन पटेल स्वतः आमच्यासोबत उपस्थित होते.”

तिथं हॉस्पिटलने एक ‘लेखन’ दाखवलं, जिथं तौसीफ व त्यांच्या परिवाराने योजना नाकारल्याचं दर्शवण्यात आलं होतं. यावर तौसीफ म्हणतात:

“हे पाहून आम्ही थक्क झालो. आम्ही कोणतंही अशा प्रकारचं पत्र दिलेलं नाही. ब्लँक कागदावर स्वाक्षरी मागितली गेली होती, आणि तो काळ खूप मानसिक तणावाचा होता. आम्ही जाणीवपूर्वक योजना नाकारण्याचं काहीही लिहिलेलं नव्हतं.”

महात्मा फुले योजना म्हणजे काय?

उद्देश: गरीब व गरजू कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा

पात्रता: ऑरेंज व येलो राशन कार्डधारक

सुविधा: ICU, ऑपरेशन, औषधे, तपासण्या, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा

996 आजारांवर मोफत उपचार — कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंड, हाडांची शस्त्रक्रिया इ.

🚫 रुग्णाकडून पैसे घेणे कायदेशीर आहे का?

नाही!

योजना मंजूर झाल्यानंतर कोणतीही रक्कम रुग्णाकडून मागणं बेकायदेशीर आहे. हे फसवणूक आणि गुन्हा आहे.

योजना लागू करणाऱ्या हॉस्पिटलसाठी अटी:

शासनमान्य Empanelment

नियुक्त आरोग्यमित्र

२४ तास डॉक्टर, नर्स व उपकरणं

कोणतीही रक्कम न घेता पूर्णतः मोफत सेवा

तक्रारदाराच्या प्रमुख मागण्या:

  1. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी
  2. उकळलेली ₹2 लाख 15 हज़ार रक्कम परत करावी
  3. दोषी डॉक्टर व व्यवस्थापनावर कडक कारवाई करावी
  4. इतर रुग्णांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यभर उपाययोजना व्हाव्यात

शेवटी मोठा सवाल:

“जर योजना मंजूर होती आणि ऑपरेशन मोफत करता येत होतं, तरीही आम्हाला पैसे का भरावे लागले? असा अन्याय इतर गरीब रुग्णांसोबतही होत असेल का? हा सर्वसामान्यांचा सवाल आहे, आणि त्याचं उत्तर शासनाने द्यावं.” — तौसीफ अहमद

📌 Global News 24 Live या प्रकरणाच्या पुढील तपशीलावर लक्ष ठेवून आहे. जर आपल्यासोबतही अशा प्रकारची फसवणूक झाली असेल, तर आमच्याशी संपर्क साधा – आपला हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *