CommunalKhandesh

तांबापुर SIR कॅम्प: 2002 च्या मतदार यादीच्या तपशीलांशिवाय प्रक्रिया अपूर्ण

तांबापुरमध्ये SIR प्रक्रियेसाठी विशेष कॅम्प; 2002 मतदार यादीच्या आधारे कागदपत्रे अनिवार्य
एकाच ठिकाणी सर्व BLO उपस्थित; नागरिकांनी आवश्यक तपशीलांसह उपस्थित राहावे – आवाहन

तांबापुर – सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेला गती देण्यासाठी दिनांक 28 मार्च रोजी शहीद अब्दुल हमीद चौक, तांबापुर येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.

या कॅम्पमध्ये परिसरातील सर्व BLO एकाच ठिकाणी उपस्थित राहणार असल्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपली SIR प्रक्रिया सहज व जलद पूर्ण करता येणार आहे.

या प्रक्रियेसाठी 2002 च्या मतदार यादीच्या आधारे तपशील देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार –

माता-पिता तसेच आजोबा-आजी यांनी 2002 मध्ये मतदान केले असल्यास त्यांची माहिती आवश्यक

संबंधित विधानसभा मतदार संघ क्रमांक

यादी भाग क्रमांक (Part Number)

यादीतील नावाच्या आधी असलेला क्रमांक (Serial Number)

तसेच अर्जदाराचे स्वतःचे मतदार ओळखपत्र व संबंधित तपशील

हे सर्व तपशील अचूक देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कॅम्पमध्ये उपस्थित राहणारे BLO पुढीलप्रमाणे –
कैलास पठारे (BLO-311), सय्यद मंजुर (BLO-312), सोहेल अहमद (BLO-313), धर्मेंद्र चौधरी (BLO-314), शेख जावेद (BLO-315), शेख बरकत (BLO-316), शेख अहमद (BLO-317) आणि योगराज सोनवणे (BLO-318). या उपक्रमाचे मार्गदर्शन सुपरवायझर संतोष तायडे सर करत आहेत।

नागरिकांच्या सोयीसाठी तांबापुर फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्तेही सक्रिय सहभाग घेणार आहेत. अध्यक्ष मतीन पटेल ,उपाध्यक्ष ईशा शेख तसेच रझाक पटेल, अरमान पटेल, सैफ पटेल, उमर पटेल, बिलाल शेख, कबीर शाह आणि नाजिम शेख हे नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत.

आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वेळेत SIR प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढे कागदपत्रांसह स्वतंत्र पडताळणी करावी लागू शकते. त्यामुळे भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी या कॅम्पचा लाभ घ्यावा.

तांबापुरमधील सर्व नागरिकांनी आवश्यक 2002 मतदार यादीतील तपशीलांसह या कॅम्पला उपस्थित राहून आपली SIR प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *