ग्लोबल न्यूज 24 लाईव्हच्या बातमीचा मोठा प्रभाव; 24 तासांत महानगरपालिका अॅक्शन मोडमध्ये, नागरिकांसाठी मार्ग खुला

सार्वजनिक रस्त्यावरील गेट उघडले; मात्र आता गेट हटविणार का? परवानगी कोणी दिली याची चौकशी होणार का?
जळगाव | प्रतिनिधीशामा कॉम्प्लेक्सच्या बाजूने गणपती नगर-तांबापुरा परिसराला जोडणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर लावण्यात आलेले लोखंडी गेट अखेर उघडण्यात आले असून नागरिकांसाठी मार्ग पुन्हा खुला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ग्लोबल न्यूज 24 लाईव्हने हा प्रश्न काल जनतेसमोर मांडल्यानंतर अवघ्या 24 तासांत महानगरपालिका प्रशासनाने दखल घेत कारवाई केली.
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत मार्ग खुला करून नागरिकांची गैरसोय दूर केली. त्यांच्या या जलद कारवाईचे स्वागत केले पाहिजे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, जनतेच्या समस्या योग्य पद्धतीने प्रशासनापर्यंत पोहोचल्या तर त्यावर तोडगा निघू शकतो.
मात्र, प्रश्न अद्याप संपलेला नाही…

❓ गेट उघडले, पण गेट अजूनही तिथेच का?
सार्वजनिक रस्त्यावर उभारण्यात आलेले लोखंडी गेट आजही जागेवर उभे आहे. आज ते उघडे असले तरी उद्या पुन्हा बंद होणार नाही याची खात्री कोण देणार?
त्यामुळे आता नागरिकांच्या मनात काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत —
🔹 सार्वजनिक रस्त्यावर हे गेट उभारण्याची परवानगी कोणी दिली?
🔹 महानगरपालिकेची अधिकृत मंजुरी होती का?
🔹 मंजुरी नसताना सार्वजनिक मार्ग अडवण्याचे धाडस कोणी केले?
🔹 गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांचा मार्ग बंद असताना कारवाई का झाली नाही?
🔹 संबंधित व्यक्तींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई होणार का?
⚠️ केवळ गेट उघडणे पुरेसे नाही; अनधिकृत गेट हटविणेही आवश्यक

नागरिकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक रस्त्यावर लावण्यात आलेले हे गेट जर अनधिकृत असेल तर ते पूर्णपणे हटविण्यात यावे. अन्यथा भविष्यात पुन्हा कधीही रस्ता बंद करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
सार्वजनिक रस्ता हा कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा गटाची खाजगी मालमत्ता नसून तो सर्व नागरिकांचा हक्काचा मार्ग आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

