Entertainment

शेंदुर्नीतील उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणारी बातमी! ग्लोबल न्यूज 24 LIVE च्या आवाजानंतर प्रशासन हललं!

दिनांक 21 जुलै 2025 रोजी ग्लोबल न्यूज 24 LIVE च्या टीमने शेंदुर्नी गावातील मोहम्मदिया इंग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सिंदूर येथे भेट देत एक गंभीर समस्येचा पर्दाफाश केला.

या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा म्हणजेच शौचालय, पिण्याचे पाणी, स्वच्छता, कंपाउंड वॉल, सुरक्षितता या बाबतीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मुली व मुलांना उघड्यावर शौचासाठी जावे लागत होते, शौचालय मोडकळीस आलेले होते व त्यामध्ये पाण्याची व्यवस्थाही नव्हती. शाळेच्या मैदानात अस्वच्छता व साचलेला कचरा होता, पाण्याची टाकी घाणेरडी व धोकादायक स्थितीत होती.

ही समस्या ग्लोबल न्यूज 24 LIVE ने आपल्या यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि पोर्टलवर प्रभावीपणे मांडली. या बातमीचा परिणाम असा झाला की केवळ चार दिवसांमध्येच जामनेरचे गटशिक्षणाधिकारी कल साहेबांनी शाळेला भेट दिली आणि तातडीने कारवाईचे आदेश दिले.

शाळेच्या प्रशासनानेही जागरूकपणे प्रतिक्रिया दिली आणि लगेचच जेसीबी मशीन बोलावून संपूर्ण परिसराची साफसफाई, भिंतींची दुरुस्ती व मैदानाचे लेव्हलिंग सुरू केलं. तसेच लवकरात लवकर मुलींसाठी स्वतंत्र शौचालय आणि पाण्याची सोय करण्याचे आश्वासन दिले.

ही बातमी केवळ एक वृत्त नाही, तर पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण आहे. ग्लोबल न्यूज 24 LIVE ने जनतेचा आवाज बनून प्रशासनाला हलवले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधेसाठी न्याय मिळवून दिला.

हीच खरी पत्रकारिता आहे – जी बदल घडवते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *