Khandesh

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील “सोनोग्राफीसाठी 5 तास बसवले… ‘उद्या या, मोठे डॉक्टर येतील’ म्हणत परत पाठवले; तक्रारीनंतरच रुग्णाला दिलासा

फि ₹120 भरून सकाळी नंबर घेतला; हेल्पलाईनवर संपर्कानंतरच डॉक्टरांची टीम सक्रिय

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमधील एक धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे रुग्णसेवेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, एका रुग्णाने सकाळी सुमारे 10 वाजता ₹120 शुल्क भरून सोनोग्राफीसाठी नोंदणी (पावतीसह) केली. त्यानंतर रुग्णाला सकाळी 11 वाजल्यापासून सोनोग्राफी सेंटरबाहेर थांबवण्यात आले.मात्र, तासामागून तास जात असतानाही कोणतीही तपासणी झाली नाही. रुग्णाला कधी एका डॉक्टरकडे, कधी दुसऱ्या काउंटरवर असे वारंवार पाठवण्यात आले.
२८ एप्रिल 2026 रोजीकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत — जवळपास 5 तास — रुग्ण फक्त प्रतीक्षेत बसून होता.

शेवटी सायंकाळी त्याला सांगण्यात आले —
“आज सोनोग्राफी होणार नाही… उद्या या, उद्या मोठे डॉक्टर येतील.”

हेल्पलाईनवर कॉल… मगच हालचालया प्रकारानंतर, सोनोग्राफी सेंटरबाहेर लावलेल्या फलकावर दिलेल्या तक्रार क्रमांकांवर संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला.पहिला नंबर सुरुवातीला Busy होता इतर दोन नंबरवर संपर्क झाला नाहीकाही वेळाने एका नंबरवरून परत कॉल आला मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. इमरान यांनी फोन रिसीव करून प्रकरणाची दखल घेतली.
त्यानंतर डॉक्टरांची टीम सक्रिय झाली आणि रुग्णाची तपासणी करून पुढील उपचारासाठी अ‍ॅडमिट करण्यात आले.

मोठे प्रश्न अजूनही कायम…

रुग्णाने सकाळी फी भरूनही 5 तास प्रतीक्षा का करावी लागली?

“मोठे डॉक्टर” नसतील तर सेवा थांबते का?

हेल्पलाईनवर कॉल केल्याशिवाय रुग्णाकडे लक्ष दिले जात नाही का?

तीन नंबर दिले असताना दोन नंबर कार्यरत का नव्हते?

फलकावर सूचना… प्रत्यक्षात वेगळी स्थिती?

सोनोग्राफी सेंटरबाहेर लावलेल्या फलकावर स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की,
रुग्णांनी अधिकृत पावतीद्वारेच पैसे भरावेत आणि तक्रारीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.

मात्र प्रत्यक्षात, तक्रार केल्यानंतरच प्रक्रिया सुरू झाल्याचे चित्र दिसून आले, ज्यामुळे व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ही सेवा की प्रतीक्षा व्यवस्थेचा बोजवारा?

सरकारी रुग्णालयात रुग्णांना वेळेत सेवा मिळणे अपेक्षित असते.
मात्र या घटनेमुळे असा प्रश्न निर्माण होतो की —
रुग्णांनी आधी तासन्तास त्रास सहन करायचा आणि मगच तक्रार केल्यावर सेवा मिळणार का?

चौकशीची मागणी या संपूर्ण घटनेची CCTV फुटेज तपासून सखोल चौकशी करावी आणि
सोनोग्राफी सेंटरमधील कामकाज अधिक पारदर्शक व जबाबदार करावे,
अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.